IPL 2022: मुंबई इंडियन्सला धक्का: ‘हा’ स्टार खेळाडू पाहिल्या सामन्यातून बाहेर

449

मुंबई – आयपीएलच्या पंधरावा हंगामासाठी अवघ्या काही दिवस उरले आहेत. येत्या 26 मार्च पासून आयपीएल 2022 सूरु होत आहे. मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स ला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यातून बाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईला यावेळी आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटलशी होणार आहे. IPL 2022 पूर्वी मुंबईने यादवला मोठ्या रकमेसह कायम ठेवले होते. मात्र, तो सध्या दुखापतग्रस्त असून अशा स्थितीत त्याला पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे.

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्याने एकट्याने संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. अलीकडच्या काळात त्याने राष्ट्रीय संघासाठीही चमकदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव 27 मार्च रोजी होणाऱ्या संघाच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही कारण त्याच्या अंगठ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर आहे, ज्याचा त्रास त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान झाला होता. सूर्यकुमार यादवला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here