भारतीय सैन्य दलात निघाली भरती; बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

1008
âÚUÎæÚUàæãUÚU ·ð¤ çàæßæÁè SÅðUçÇUØ× ×ð´ ¿Ü ÚUãUè âðÙæ ÖÌèü ÚñUÜè ×ð´ ÎæñǸ Ü»æÌð ¿êM¤ ß âêÚUÁ»ÉU ·ð¤ Øéßæ

भारतीय सैन्य दलात निघाली भरती; बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

। दहावी आणि बारावीचे निकाल लागू लागले की, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे पुढे काय ? बहुतेक वेळा या परिक्षांमध्ये मिळणाऱ्या टक्केवारीवर पुढील भवितव्य ठरविण्याकडे कल असतो. त्यातही विशेष ओढा असतो तो वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि आता स्पर्धा परीक्षांकडे.

तसेच या परिक्षांमध्ये अपेक्षेएवढे गुण मिळाले नाही, तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये नैराश्य निर्माण होते आणि सर्व जीवन अंध:कारमय वाटू लागते. तसेच या अभ्यासक्रमांच्या वाढत्या खर्चामुळे पालक हवालदिल होतात.

मात्र भारतीय सैन्य दलात इच्छिणाऱ्या आणि चमकदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळत आहे.

भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विष घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. यासाठी पदांची संख्या 90 आहे. 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2004 या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील.

बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान 70 टक्के गुण अनिवार्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2020 आहे. www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर तुम्ही अर्ज भरू शकता.

दरम्यान, टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी 1 वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here