दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहे. या निकालामध्ये देशाच्या सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला जोरदार धक्का लागला आहे. पाच राज्यात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला 10 पेक्षा कमी जागा मिळाले आहे.
पक्षाच्या अशा निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, त्यांचा पक्ष या जनादेशातून धडा घेईल आणि देशाच्या लोकांच्या हितासाठी काम करत राहील.
त्यांनी ट्विट केले की, ‘आदेश नम्रपणे स्वीकारा. जे जिंकले त्यांना शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल अभिनंदन. यातून आम्ही धडा घेऊ आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू, असेही राहुल गांधी म्हणाले.