आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एक दिवसाची कोठडी…

अहमदनगर,दि.३ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. कोर्टाने एक दिवसाची ही कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपींना एका दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. या दरम्यान त्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात मुख्य ड्रग्ज पेडलर कोण आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एनसीबीने आरोपींची कोठडी मागितली होती.

शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीकडे आरोपींच्या विरुद्ध पुरावे असल्याचं अधिकाऱ्यांनी कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी आरोपींची कस्टडी मागितली आहे.

मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टीची माहिती विभागाला आधीच मिळाली होती. गेल्या १५ दिवसांपासून NCB टीम या ऑपरेशनची तयारी करत होती. शनिवारी सकाळी २० ते २२ अधिकाऱ्यांचे पथक सर्च वॉरंट घेऊन एनसीबी कार्यालयातून निघाले. सर्व अधिकारी साध्या वेशात होते, त्यामुळे ते कोणत्याही अडचणीशिवाय आणि शंका येणार नाही असे पार्टीत सहभागी झाले. अधिकाऱ्यांनी सर्वांना खोलीत नेले आणि तेथे त्यांची कसून झडती घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here