पुणे – आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये सध्या मेगा लीलव होत आहे. या लिलावामध्ये 10 संघाने भाग घेतला आहे. या लीलावामध्ये तब्बल 590 खेळाडूवर बोली लावली जाणार आहे.
या लिलावामध्ये अंडर 19 विश्व कप मध्ये म्हणून बेबी एबी म्हणून चर्चेत आलेला डेवाल्ड ब्रेविस ने देखिल भाग घेतला होता. त्याच्यासाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईने बोली लावली. मात्र आखेर त्याला मुंबईने३ कोटींमध्ये संघात दाखल केले. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.