ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द.आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं होतं. तब्बल एक वर्षासाठी आमदारांचं निलंबन करणं योग्य होणार नाही. कारण एका आमदारांचं निलंबन म्हणजे केवळ एकट्याचं नव्हे तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघालाही दिलेली ही एकप्रकारची शिक्षाच आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. देशातील आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा हा पहिलाच निर्णयअशाप्रकारचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना 60 दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे तो बडतर्फ झाल्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य आहे. म्हणूनच आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करणं चुकीचं आहे”, असंही कोर्टाने नमूद केलं होतं.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पसंबंधात नागरिकांशी साधला संवाद
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पसंबंधात नागरिकांशी साधला संवादऔरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) :पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भू संपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा, मिळणारा मावेजा आदी...
अमेरिकेशी करार केल्यानंतर भारत चीप करेल, जगातील सेमीकंडक्टरची पोकळी भरून काढू शकेल
नवीन कार खरेदी करणाऱ्या लोकांना महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दुसरी चावी मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक घटकांच्या किमती...
ऑक्टोबर हिट’ नव्हे पाऊस; पुढील दोन दिवसात मुसळधार
“
ऑक्टोबर म्हटलं की उन्हाचा चटका हे समिकरण डोक्यात बसलं आहे. पण यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे....
Operation Valentine Trailer : मानुषी छिल्लरच्या ‘ऑपरेशन व्हेलेंटाईन’ चा ट्रेलर लाँच
नगर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने (Pulwama Terror Attack) संपूर्ण भारत देश हादरला होता. आता हाच पुलवामाचा हल्ला आणि...