जी-मेल अकाऊंट होऊ शकतं बंद;

जी-मेल अकाऊंट होऊ शकतं बंद;

‘या’ तारखेपासून होणार मोठा बदल..!*

जगातील बहुतेक लोकांकडे अँड्राईड असू वा आयफोन असू स्मार्टफोन वापरण्यासाठी जी-मेल आयडी बहुतेकदा लागतो. हा जी-मेल असला म्हणजे तुम्ही गूगलचे भरपूर ॲप्स इन्स्टॉल करून वापरू शकता. पण तुम्हाला माहिती आहे आहे का आता यापुढे तुम्हाला एका क्लिकवर Google खात्यात लॉग इन करता येणार नाही. तुमच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला आता टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल.

*टू स्टेप व्हेरिफिकेशन कधीपासून?*

9 नोव्हेंबरपासून जी-मेल वापरणाऱ्या स्मार्टफोन धारकांसाठी ही प्रक्रिया सक्तीची केली जात आहे. कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या एका ब्लॉगमध्ये सांगितले होते कि, प्रत्येकाने त्यांच्या Google (गूगल) खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे, सुमारे 150 दशलक्ष गूगल वापरकर्ते आपोआप या प्रक्रियेचा एक भाग बनतील. जर वापरकर्त्याने टू-स्टेप व्हेरिफिकेशन केले नाही, तर त्यांना Google खात्यात लॉग इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

*टू-स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय?

*टू स्टेप व्हेरिफिकेशन हा सुरक्षेचा एक स्तर आहे, थोडक्यात सांगायचं झाल्यास 2 स्टेपमध्ये आपल्या गूगल अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करावी लागणारी प्रक्रिया. यानंतर तुम्ही तुमचे खाते अधिक सुरक्षित ठेवू शकता. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचा गूगल अकाऊंटचा पासवर्ड टाका आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला OTP टाकावा लागेल. तुम्ही जर OTP नंबर टाकला नाही तर, तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ओटीपी मिळवण्यासाठी तुम्ही एसएमएस, व्हॉईस कॉल किंवा मोबाइल ॲप वापरू शकता.

*टू-स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं?*▪️ सर्वात आधी तुम्हाला तुमचे Google खाते उघडावे लागेल. ▪️ नेव्हिगेशन पॅनेलमधील सुरक्षा पर्याय निवडा. ▪️ सिक्युरिटीमध्ये जाऊन तुम्हाला Google मध्ये साइन इन करण्यासाठी जावे लागेल. ▪️ तिथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2-स्टेप व्हेरिफिकेशन) वर क्लिक करावे लागेल ▪️ मग Get Started वर क्लिक केल्यानंतर तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता. ▪️ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. संपूर्ण केल्यावर टू स्टेप व्हेरिफिकेशन केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here