UP election: ओवेसीने दिली मोठी प्रतिक्रीया; म्हणाले, 80:20..

365

दिल्ली – नुकताच देशाचा लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झालाय पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असून एका राज्यात आम आदमी पार्टीने बहुमत प्राप्त केले आहे.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपच्या विजयाचे वर्णन ’80:20′ विजय असे केले आहे.त्यांचा संदर्भ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या विधानाकडे होता. यूपी निवडणुकीत 80:20 अशी लढत असल्याचे योगी म्हणाले होते.

हैदराबादमध्ये ओवेसी म्हणाले की, देशातील लोकशाही पुढील अनेक वर्षे अशीच राहील. ओवेसींच्या पक्ष AIMIM ला उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला एकही जागा मिळालेली नाही. निकालावर ओवेसी म्हणाले की AIMIM यूपीच्या लोकांच्या निर्णयाचा आदर करते. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांचा पक्ष यापुढील काळातही प्रयत्नशील राहणार आहे. AIMIM कठोर परिश्रम करेल आणि भविष्यात त्याच्या कमकुवतपणावर मात करेल. उत्तर प्रदेशातील एआयएमआयएमसाठी भविष्य चांगले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यूपी निवडणुकीच्या निकालांवर ओवेसी म्हणाले की, यश नक्कीच आले आहे, पण ते 80:20 चे यश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आधीच्या टिप्पणीचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना ओवेसी यांनी हे वक्तव्य केले. जानेवारीच्या सुरुवातीला एका मीडिया कॉन्क्लेव्ह दरम्यान, योगी आदित्यनाथ म्हणाले होते की यूपी निवडणूक ’80 टक्के विरुद्ध 20 टक्के’ अशी लढत असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here