TET Exam Scam: आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला पोलिसांकडून अटक

462

पुणे – पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत आज शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (TET) प्रकरणात कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला अटक केली आहे. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते.

शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील २०१८ च्या निकालात घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे तसेच परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा तत्कालीन व्यवस्थापक सामील झाल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली असून दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केलेली आहे. परीक्षेतील निकालासाठी ५०० अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी सुखदेव हरी डेरे तसेच जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे यांच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच संजय शाहूराव सानप यांना देखील अटक करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here