Russia – Ukraine War: धक्कादायक! आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू

446

मुंबई – मागच्या सात दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत अनेक नागरिक जखमी देखील झाले आहे यातच आता युक्रेनमधून भारतासाठी पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. विद्यार्थ्याला स्ट्रोक आला आणि तो बराच काळ रुग्णालयात होता, अशी माहिती समोर आली आहे.

चंदन जिंदाल नावाचा २२ वर्षीय विद्यार्थी विनितसिया नॅशनल पायरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तो मूळचा पंजाबचा होता. चंदनला इस्केमिक स्ट्रोक आला होता आणि त्याला विनितसिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहून चंदनचा मृतदेह भारतात परत आणण्याची विनंती केली आहे.

मंगळवारी खार्किव्ह शहरात झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २४ तासांत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here