तुरुंगात आरोपींचा वाढदिवस; चौघे निलंबित
संगमनेर : शहर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या तुरुंगातील आरोपींनी वाढदिवस साजरा केला होता. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत शहर पोलिस ठाण्यातील चार पोलिसांचे निलंबन केले आहे.
सहायक उपनिरीक्षक रवींद्र कुलकर्णी, पोलिस हवालदार आनंदा भांगरे, पोलिस नाईक रामदास भांगरे, पोलिस हवालदार संजय साबळे या चौघांचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबन केले आहे.
तत्पूर्वी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संबंधित कर्मचार्यांचा कसुरी अहवाल सादर केला होता. त्यावरुन वरील चौघांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.











