ट्रान्झॅक्शन फेल होऊन खात्यातून पैसे कट झाल्यास ‘हे’ करा, पैसे मिळतील परत

ट्रान्झॅक्शन फेल होऊन खात्यातून पैसे कट झाल्यास ‘हे’ करा, पैसे मिळतील परत

बँक खात्यातून पैसे कापले गेले, मात्र ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पैसे त्वरित खात्यामध्ये येणं अपेक्षित असतं. पण अनेकदा असं होतं की, खात्यामध्ये पैसे यायला काही वेळ जातो. ग्राहकांना आपले पैसे मिळवण्यासाठी तक्रार करण्याची देखील आवश्यकता भासते.

असे मिळतील पैसे परत-

जर तुमचे डिजिटल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पैसे परत आले नाहीत तर तुम्ही UPI App वर जाऊन तक्रार करू शकता. याकरता तुम्हाला ‘पेमेंट हिस्ट्री’ पर्यायावर जावं लागेल.

याठिकाणी रेज डिस्प्यूटवर जाऊन तुमती तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार योग्य असल्यास बँक पैसे परत करेल.

जर तक्रार केल्यानंतर 7 दिवसांच्या आतमध्ये ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर बँकांना भरपाई द्यावी लागू शकते.

फेल ट्रान्झॅक्शनच्या प्रकरणात आरबीआयचे नियम 20 सप्टेंबर 2019 पासून लागू झाले आहेत.

30 दिवसांच्या आतमध्ये करा तक्रार- ग्राहकांना तेव्हाच ही रक्कम मिळेल, जर व्यवहार फेल झाल्याची तक्रार 30 दिवसांच्या आत केली. ट्रान्झॅक्शनची पावती किंवा खात्याचे स्टेटमेंट देत तुम्हाला ही तक्रार करावी लागेल. जर 7 दिवसांच्या आतमध्ये तुमचे पैसे परत आले नाहीत, तर तुम्हाला ॲनेक्शर-5 फॉर्म भरावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here