ऑक्‍टोबर हिट’ नव्हे पाऊस; पुढील दोन दिवसात मुसळधार

ऑक्टोबर म्हटलं की उन्हाचा चटका हे समिकरण डोक्यात बसलं आहे. पण यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दसऱ्याला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांहून आधिक काळ रखडलेला मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण देशातून तो माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मोसमी वाऱ्यांचे देशात आगमन होऊन आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे वेळांच्या नियोजनानुसार आतापर्यंत मोसमी वारे देशातून माघारी फिरणे अपेक्षित होते. मात्र, कमी दाबाच्या पट्यांमुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

अंदाज काय?
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, २५ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. २६ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here