कथित अपहरण आणि बाळाच्या हत्येची मुख्य सूत्रधार ही जन्मदाती आईच!
काळाचौकीमधून गायब झालेल्या साडेतीन महिन्याच्या मुलीचा पत्ता लागला असून दुर्दैवाने ही मुलगी मयत झाली आहे मात्र तिची आई सपना हीच या कथित अपहरण आणि बाळाच्या हत्येची मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आले आहे . मुलीला कुणीही पळवून नेले नसून तिच्या आईनेच तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याने आईच ह्या निष्पाप जीवाचा कर्दनकाळ ठरली आहे . उपलब्ध माहितीनुसार, सपना मकदुम (२९) असे या आईचे नाव असून सपनाला अगोदर एक मुलगी होती. मात्र दुसरीही मुलगी झाल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून आईच्या नात्याला सपनाने काळिमा फासला आहे . कपड्यांच्या बदल्यात भांडी विकणारी महिला डोळ्यावर स्प्रे मारून बेशुध्द करून मुलीला पळवून घेऊन गेली असा बनाव या आईने रचला होता मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आणि तिच्या ह्या धक्कादायक कृत्याचा पर्दाफाश झाला. काळाचौकी फेरबंदर परिसरातील संघर्ष सदन इमारतीत ही घटना घडल्याचे वृत्त आले होते . मुलीची आई सपना हिने रचलेल्या बनावाप्रमाणे ,’ एक अनोळखी महिला बास्केट विकण्याच्या बहाण्याने आपल्याकडे आली. कपडे आणि जुने मोबाईल घेऊन बास्केट विकण्याचे काम ती करत होती. सदर महिलेने बास्केट विकण्यासाठी आपल्याकडे जुन्या मोबाईलची मागणी केली. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता. तो मोबाईल शोधण्यासाठी मी आतील खोलीत गेल्यानंतर हीच संधी साधत खाटेवर असलेल्या बालिकेला त्या अज्ञात महिलेने उचलले आणि ती पसार झाली ‘. आई असे कृत्य करू शकेल यावर पोलिसांचा देखील विश्वास बसत नव्हता म्हणून पोलिसांनी घटनेचा तपास करण्यासाठी पथके कामाला लावली होती तर आरोपी महिलेचे स्केच देखील जारी करण्यात आले होते मात्र अखेर आई हीच स्वतःच्या मुलीचा कर्दनकाळ ठरल्याने समाजमन निशब्द झालेले आहे . आरोपी आईला कठोर कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक आता करत आहेत.