श्रीगोंदा – वीट भट्टी कामगारांनी वीट भट्टी मालकाचे 70 हजार रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की लिंपणगाव या ठिकाणी सुनिल किसन आढाव यांचा वीटभट्टी व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी जळगाव या ठिकाणावरून काही मजूर कामासाठी आणले होते . त्यांना 900 रुपये रोज मजुरी देण्याचे ठरले होते व प्रत्येक जणाला वीस हजार रुपये उचल देखील देण्यात आले होते.
मात्र कामगारांनी एक महिना काम केल्यानंतर मनोहर सुखदेव वाकोडे, मंगेश मनोहर वाकोडे, करण मनोहर वाकोडे आणि दीपक मेढे यांनी सुनिल आढाव यांच्या कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये घेऊन पसार झाले.
या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करत आहेत.