मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागच्या काही दिवसांपासून घरातूनच काम करत आहे. याच मुद्द्यावरून भाजपकडून नेहमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून केव्हा काम करणार याचे उत्तर एका मुलाखतीमध्ये त्यांनी दिले आहे.
कधीपासून बाहेर पडणार?
यावेळी घराबाहेर पडून कधीपासून कामाला सुरुवात करणार? मंत्रालयात कधीपासून जाणार? याविषयी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी त्याला खोचक शब्दांत उत्तर दिलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी या कार्यक्रमाला आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का? असं वाटलं होतं. सलग तिसऱ्या वर्षी आलोय. न सांगता येणं हे कायम चांगलं असतं. पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं असं मुख्यमंत्री म्हणाले.