अहमदनगर – श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती.
तरड गव्हाण (ता . श्रीगोंदा) सिना नदीचे पात्रातुन एक इसम त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर चे ट्रॉली मध्ये विना परवाना बेकायदा वाळू भरून चोरी करीत आहे आता गेल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यांनी लगेच पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते पो.कॉ टाके , पो.कॉ साठे या पथकातील कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी जावून कारवाई करण्यास सांगितले. बातमीतील नमुद ठिकाणी पोलीस स्टाफ व पंच असे नदी पात्रा कडे जात असताना 20.45 वा चे सुमारास सिना नदीचे पात्रातून एक ट्रॅक्टर ट्रॉली चालताना दिसले.
सदर ट्रॅक्टर चालक यांने पोलीसांना लांबुन पाहून त्याने त्याचे ट्रॅक्टरीचे ट्रॉली मधील बाजू जागीच खाली करुन टॅक्टर व ट्रॉलीसोडुन सदर चालक हा पळून गेला सदर ट्रॅक्टर चालकाचा आजू बाजूस शोध घेतला माञ तो मिळुन आला नाही.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते यांनी फिर्यादीवरून विना परवाना बेकायदा वाळुची चोरी करण्याचा प्रयत्न करताना मिळुन आल्याने सदर ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरुध्द भा.द.वि कलम 379.511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव ,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल टाके,पोलीस कॉन्स्टेबल साठे,सहाय्यक फौजदार नवले आदीच्या पथकाने कारवाई केली पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री नवले करत आहेत.











