सरकारी गौण खनिजवर दरोडा? 

सरकारी गौण खनिजवर दरोडा? नगर – जामखेड रस्त्याजवळ एका बाह्यवळण रस्त्याचं काम सुरु आहे.

त्यासाठी शासनानं एका शेतकर्‍याची जमीन संपादित केली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्या शेतकर्‍याला तब्बल ९० लाख रुपयांचा मोबदलाही देण्यात आला आहे.

मात्र या शेतकर्‍यानं सरकारनं संपादित केलेल्या जागेत १८०० ते १९०० ब्रास गौण खनिजचं उत्खनन केलं.यामध्ये मोठी आर्थिक गडबड झालेली आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजचं बेकायदा उत्खनन केलं जातं, तेव्हा थातूर मातूर पंचनामा करुन संबंधिताला फक्त नोटिसा पाठविल्या जातात, त्याचवेळी ‘कुठं तरी पाणी मुरतंय’, अशा बोलक्या प्रतिक्रिया या बांगरी परिसरात ऐकू येताहेत.

विशेष म्हणजे रुईछत्तीसी परिसरात या १८०० – १९०० ब्रास गौण खनिजच्या उत्खननाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी ७०० ते ८०० ब्रासचं उत्खनन करण्यात आलंय.

त्यामुळे या सर्व गैरकारभाची सखोल चौकशी होऊन नगर तहसीलच्या लालची, हावरट आणि मुजोर ‘सुहास’विरुध्द गुन्हा दाखल होणार का, हा खरा महत्वाचा आणि सर्वांना अंतर्मुख करणारा सवाल आहे.

‘सुहास’च्या नार्को टेस्टची होतेय मागणी!

प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख येणार, अशी टूम निघाली आणि आपल्या देशात काँग्रेसचं जाऊन भाजपचं सरकार सत्तेवर आलं.

मात्र अद्यापपर्यंत कोणाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आले नाहीत. मात्र या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याकडून नगर तहसीलच्या ‘सुहास’नं वरिष्ठांना देण्यासाठी १५ लाख रुपये घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे १५ लाख रुपये मिळाले की नाहीत, हे पाहण्यासाठी या ‘सुहास’ची एकदा ब्रेनमॅपिंग किंवा नार्को टेस्ट व्हायलाच हवी, अशी मागणी होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here