अहमदनगर – शिवजयंती निमित्त विनापरवाना डीजे लावून मिरवणूक काढल्याप्रकरणी २७ जणांविरूध्द नगर शहर पोलिसांनी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत
पाच साऊंड सिस्टिमही जप्त केल्या आहेत.
करोनाचा प्रभाव कमी झाल्याने यंदा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. नगर शहरात शनिवारी सकाळपासून शिवजयंती मिरवणुकीची तयारी सुरू केली होती, दरम्यान शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणाऱ्या मंडळास देण्यात आल्या होत्या. मिरवणुकीला परवानगी नाकरण्यात आली होती. भादंवि कलम १४९ नुसार पाच मंडळांस नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक काढल्यानंतर कोतवाली व तोफखाना पोलिसांनी या मिरवणुका मध्येच बंद करून साऊंड सिस्ट्रिम जप्त केली.
तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश अरूण कराळे, ओम महेश दोन्ता, करण विजय , तनपुरे. (सर्व रा. श्रीराम चौक, सावेडी, नगर), सुनील भाऊसाहेब गहिरे (रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी चार फिर्याद दिल्या आहेत. त्यानुसार २३ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.