अहमदनगर – दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस २ (एन) (एल), ४२०, ५०४,५०६, दिव्यांग अधि.का. २०१६ चे कलम ९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे.
नगर तालुक्यातील तरूणी खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिची गणेश मडके सोबत ओळख झाली होती. गणेशला फिर्यादी या दिव्यांग असल्याची माहिती होती. फिर्यादीला गणेशने लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० या दरम्यान तिच्यावर अत्याचार केला.
तसेच गणेशने फिर्यादीकडून वेळोवेळी ९५ हजार रूपये उसने घेतले ते परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.