Cooking
रताळी स्वच्छ धुवून घ्यावी. बटाट्याच्या करतो तशा पातळ काचऱ्या कराव्यात. (१ कप काचऱ्या असतील तर १/२ कप किसलेला गूळ वापरावा)
२) तूप कढईत गरम करावे. त्यात ड्राय फ्रुट्स तळून बाजूला काढावीत. त्याच तुपात रताळी परतावीत. झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफ काढावी. नंतर शिजेस्तोवर नुसते परतावे.
३) काचऱ्या शिजल्या की किसलेला गूळ घालून हलक्या हाताने मिक्स करावे.दोन छोटे चमचे पाणी घाला, गूळ वितळला की थोडावेळ परतावे म्हणजे रताळी छान खरपूस होतील.
एकदम गरम वाढू नये( पाकामुळे चटका बसतो) किंचित निवाले की वाढावे.
अँड शितल स बेद्रे.












