पोलीस भरती पेपर फुटला, अफवा पसरविणा-या तरूणावर गुन्हा दाखल

पोलीस भरती पेपर फुटला, अफवा पसरविणा-या तरूणावर गुन्हा दाखल?बृहन्मुबंई पोलीस पदाची लेखीपरिक्षेचा पेपर हा

अहमदनगर – बृहन्मुंबई पोलीस भरती 2019 चा पेपर फुटल्याबाबतची अफवा पसरविणा-या तरूणावर अहमदनगर येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर जि. अहमदनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.14.नोव्हेंबर 2021 रोजी होणा-या बृहन्मुंबई पोलीसाचा पेपरबाबत अफवा पसरविणारा तरूण न निलेश दिलीप पोर्ट (वय 26, रा. बारादरी ता. नगर जि. अहमदनगर) याने tweet केले कि, बृहन्मुंबई पोलीस पदाची होणारी लेखी परीक्षा 14 नोव्हेंबर ला राज्यात विविध केंद्रावर होणार आहे. अहमदनगर वरील काही केंद्रावर मुंबई पोलीसांचा पेपर फोडण्याच्या बातम्या येत आहेत, तरी यावर आपण तातडीने कारवाई करावी अशी विनंती असे tweet केल्याने चौकशीकामी tweet करणारा इसम यास पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर येथे सायबर पो स्टे , अहमदनगर यांच्या मार्फतीने त्यांची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने त्याचे नाव निलेश दिलीप पोटे (वय 26 वर्षे रा. बारादरी ता. नगर जि. अहमदनगर) असे सांगितले. व तो सदर परिक्षेतील एक उमेदवार असल्याचे समजले त्याप्रमाणे त्याने त्याचे मोबाईल वरून सदर tweet केल्याचे आढळून आले आहे.पोलीस भरतीचा पेपर फुटल्याबाबतची अफवा पसरविणारा तरूण उमेदवार याविरूद्ध सपोनि संजय माहादेव सुर्वे (वय 57, नेमणुक- मुंबई वाहतूक विभाग, दिंडोशी यांनी कॅम्प पो स्टे, भिंगार, अहमदनगर) येथे समक्ष तक्रार दिली आहे.सन 2019 ची मुंबई पोलीस पदाची लेखी परीक्षा दि.14 नोव्हेंबर 2021 रोजीची लेखी परीक्षाबाबत निलेश पोटे याने तो करीत असलेल्या tweet ने बाकी परीक्षार्थी विद्यार्थामध्ये भय पसरवून असंतोष किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होऊन परिक्षार्थी हे सार्वजनिक शांतता विरूद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होतील याची जाणीव असताना देखील NileshPote@NileshPote १७ Twitter द्वारे tweet केल्याने तरूणाविरूद्ध कॅम्प पो स्टे, भिंगार जि. अहमदनगर येथे भादवि कलम 505 (1) (ब) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.?बृहन्मुबंई पोलीस पदाची लेखीपरिक्षेचा पेपर हा सुरक्षितसर्व नागरिक व उमेदवार यांना अहमदनगर पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते कि, बृहन्मुबंई पोलीस पदाची लेखी परिक्षेचा पेपर हा सुरक्षित असुन वरील tweet करण्यात आलेली अफवा असुन त्यावर विश्वास ठेवू नये. अहमदनगर पोलीस हे अशा अफवा पसरविणा-यांवर लक्ष ठेऊन असून जो कोणी अशा प्रकारची अफवा पसरवेल त्याचे विरूद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, तसेच सुजान नागरिकांच्या अशी अफवा पसरविणारे निदर्शनास आले तर तात्काळ नियंत्रण कक्ष, अहमदनगर 0241 -2416100/138 अथवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन अहमदनगर प्रभारी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here