नितेश राणे यांचां अटकपूर्व जामीन नामंजूर
.
सिंधुदुर्ग:संतोष परब हल्लाप्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी झाली.
. काल नितेश राणे यांचे वकील अॅडव्होकेट संग्राम देसाई आणि सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप घरत यांनी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद केला.
साडेसहा वाजता न्यायालयाची वेळ संपली. संग्राम देसाई यांनी पुन्हा १० मिनिटांची वेळ वाढविण्याची न्यायाधीशांकडे विनंती केली होती.
१० मिनिटे पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने आज पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगितलं होते.
त्यानुसार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार झाली.
आजच्या सूनवणी अॅडव्होकेट संग्राम देसाई आणि सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप घरत हे दोघीही सुनावणीच्या वेळी मे. कोर्टात अनुपस्थित होते.
वरील सुनावणी हि सिंधुदुर्ग सेशन कोर्टात श्री. एस.वी. हांडे साहेब यांच्या समोर करण्यात आली होती. त्यावेळी सत्र न्यायाधिश साहेब यांनी जामीन अर्ज फेटाळला.