डॉ. सुनिल पोखरणा यांचां अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल प्रकरणी मूळ अर्जावर म्हणणे देणेकामी सरकारी पक्षातर्फे मुदत अर्ज दाखल.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी निलंबित झालेले तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात डॉ.पोखरणा यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्यामुळे डॉ. सुनिल पोखरणा यांचां अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी मूळ अर्जावर म्हणणे देणेकामी सरकारी पक्षातर्फे मुदत अर्ज दाखल केला आहे. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.सदर प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना मंगळवारी (ता.9) अटक करण्यात आली आहे. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटल अग्नितांडवात निष्पाप बळीची संख्या बारा झालेली आहे .