राहुरी – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे एका विधवा महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत तू मला आवडतेस, माझ्याशी संबंध ठेव. असे म्हणत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तम शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
विधवा महिलेने तिच्या कुटुंबासह राहुरी फॅक्टरी येथे राहते. ती एक दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. उत्तम शिंदे हा नेहमी त्या महिलेचा पाठलाग करून तिच्यावर पाळत ठेवतो. दि. १२ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान ती महिला दुकानात असताना उत्तम शिंदे रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी हा दुकानाच्या समोर आला. त्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करू लागला. त्यावेळी ती महिला त्याला म्हणाली, तू नेहमी माझा पाठलाग का करतोस? अशी विचारणा केली. तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करून तू मला आवडतेस, तू माझेशी संबंध ठेव. नाहीतर तुला मी इथे राहू देणार नाही.
घटनेनंतर महिलेने राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी उत्तम शिंदे, रा. राहरी फॅक्टरी ता. राहरी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार डी. एन. गर्जे करीत आहेत.










