चालत्या ट्रक मधुन ऊसतोडणी कामगाराचा बैल पडला

*चालत्या ट्रक मधुन ऊसतोडणी कामगाराचा बैल पडला*

रुईछत्तीसी (दि.२०)ऐकावे ते नवलच पण घटना तशीच घडली आहे. सकाळी सकाळी नगर तालुक्यातील दहिगाव येथे गावातील ‌नागरीकांची दुध घालण्याची लगबग चालू होती.तितक्यात मोठा आवाज झाला रस्ते कडे पाहताय तर ऊसतोडणी कामगारांच्या ट्रकला खड्यात हेलकावे बसल्याने ट्रक मधील ऊसतोडणी कामगारांचा बैल चालत्या ट्रक मधुन सह्याद्री डेअरी समोर पडला होता.डेअरी वर दुध घालणार्या शेतकरीनी रस्तेकडे तात्काळ धाव घेतली चक्कं बैल डा़ंबरीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.तरी दहिगाव गावातील जागृक नागरीकांनी सदर बैलाला प्राथमिक उपचार करून चारा पाण्याची व्यवस्था केली. नगर-सोलापूर रस्तवरील खड्याचा फटका या मुक्या जनावरा हि सुटलेले नाहीत. बैल पडल्या मुळे ऊसतोडणी कामगार मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटने वरून नगर सोलापूर रस्त्यावरील खड्डे किती भयानक परिस्थिती असेल हे लक्षात येईलच. चालत्या ट्रक मधुन बैल पडल्याचा मेसेज हा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर व्हायला झाल्याने सदर बैल मुळ मालाकाला पुन्हा मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान दिसत होते.ऊसतोडणी कामगाराला त्यांचा बैल परत मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबाचे होणारे आर्थिक नुकसान टळेल, सोशल मीडियाचा वापर योग्य केल्यास समाजात योग्य ते बदल नक्कीच घडत असतात हे यावरून स्पष्ट होते. या वेळी हा बैल सुपुर्द करतांना सुभाष गांधी, उपसंरपच महेश म्हस्के, दादासाहेब शिंदे, गावातील जागृक नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here