चार जिल्ह्यात जबरी चोरी , अट्टल गुन्हेगाराला अटक…

397

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील श्रीमती सुमन वामन रायकर यांना अज्ञात इसमाने घरी सोडतो असे सांगून बळजबरीने दुचाकीवर बसवत निमगाव खलु गावच्या शिवारात नेवून मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने , रोख रक्कम व मोबाईल असा 42 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाचे आधारे तपास करत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रकाश अजिनाथ गायकवाड वय 46 वर्षे रा बेनवडी ता.कर्जत याला अटक करून पाच दुचाकीसह 3 लाख 30 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या बाबत सविस्तर असे की तालुक्यातील हंगेवाडी येथील श्रीमती सुमन वामन रायकर यांना 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने घरी सोडतो असे सांगून बळजबरीने दुचाकीवर बसवत निमगाव खलु गावच्या शिवारात नेवून हातातील दगडाने रायकर यांच्या नाकावर मारुन दुखापत करत त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे दागिने , रोख रक्कम व मोबाईल असा 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाचे आधारे तपास करत सदरचा गुन्हा बेनवडी ता.कर्जत येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रकाश अजिनाथ गायकवाड वय 46 वर्षे याने केला असल्याची माहिती मिळताच त्याला तेथून ताब्यात घेत अधिक चौकशी करताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देत गुन्ह्यात चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी 33 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ताब्यात दिले.

अधिक तपास करत असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथून हीरो पेंशन प्रो मोटार सायकल चोरुन आणल्याचे सांगितले मोटार सायकल चोरीचे गुन्ह्याचे अनुशंगान तपास केला असता त्याचेकडून पाच मोटार सायकली हस्तगत केल्याने श्रीगोंदा पोलिसांनी जबरी चोरीचा तसेच मोटार सायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणुन 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेला आरोपी हा सराईत चोर असून त्याचेवर अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दुचाकी चोरी यासारखे सुमारे 26 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here