कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवा – जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

386

अहमदनगर – कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आणि जिल्‍ह्यातील रुग्‍ण संख्‍या कमी होण्‍यासाठी कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍या.

आयोजित जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या वतीने कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते.

यावेळी बैठकीत जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्‍हाधिकारी संदीप निचित, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, निवासी वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. बांगर, महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजूरकर यावेळी उपस्थित होते.

पुढे भोसले म्हणाले की नगरपालिका हद्दीत लसीकरण व चाचण्‍या वाढवाव्‍यात. जिल्‍ह्यात संगमनेर, नेवासा, राहुरी आणि श्रीगोंदा या तालुक्यात चाचण्‍या व लसीकरण कमी प्रमाणात होत आहे ते वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने तेथील आरोग्‍य यंत्रणांनी प्रयत्‍न करावेत. दैनंदिन अहवाल नियमित सादर करावा. लसीकरण व कोविड चाचण्‍यांसाठी विशेष मोहिम राबवावी, असे त्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here