अल्पवयीन मुलीला धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

411

नाशिक – अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करुन त्या मुलीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दंड देखील ठोठावला आहे. सचिन मुरलीधर सोनवणे असे आरोपीचे नाव आहे.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सचिनने नोव्हेंबर २०१८ मध्ये धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या काकाच्या मुलीवरही अत्याचार करण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली मात्र सचिनने पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. यात पीडिता गर्भवती झाली व तिने एका चिमुकलीला जन्म दिला.

या प्रकरणी सचिनविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. सचिनविरोधात गुन्हा साबित झाल्याने विशेष पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी सचिनला जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here