मुंबई – आयपीएल (IPL) मध्ये प्रथमच भाग घेणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलचा पंधरावा हंगामा सुरू होण्याअगोदरच मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण जगात आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे ओळखला जाणारा इंग्लंडच्या स्टार फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) ने संपूर्ण आयपीएल मधून अचानकपणे आपला नाव मागे घेतला आहे . त्यामुळे आता गुजरात टायटन्स ला मोठा धक्का बसला आहे.बायो बबलच्या समस्येचे कारण देत लीगमधून माघार घेण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
जेसन रॉय आयपीएल 2020 मध्ये देखील वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेमधून आपले नाव मागे घेतले होते. गुजरात टायटन्सने बेंगळूरूमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये जेसन रॉयला दोन कोटी रुपये देऊन आपल्या संघात सहभागी केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार रॉय यांनी गेल्या आठवड्यात अहमदाबादस्थित फ्रँचायझीला त्यांच्या निर्णयाची माहिती दिली होती. मात्र संघाने अद्याप त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही.
आयपीएलमध्ये या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. 26 मार्च ते मे अखेरपर्यंत सुमारे दोन महिने ही लीग आयोजित केली जाईल. यामध्ये गुजरातची कमान हार्दिक पांड्याकडे असेल, तर संघात राशिद खान, शुभमन गिल, डेव्हिड मिलर या खेळाडूंचा समावेश आहे.