मुंबई – पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावापुर्वी (mega auction) आयपीएलमध्ये दाखल झालेल्या नवीन संघ अहमदाबादबद्दल (Ahmedabad team) नविन माहिती समोर आली आहे. या संघाने मेगा लीलावपुर्वी आपल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे.( IPL 2022: Big update before Mega Auction, Dhurandhar to play for Ahmedabad team)
भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya), अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर राशिद खान (Rashid Khan) आणि भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल (shubman gill) आता अहमदाबाद फ्रेंचायझीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना संघाने सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनवण्यात आले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी CVC कॅपिटल पार्टनर्सकडे आहे.
अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना २२ जानेवारीपर्यंत त्यांच्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. अहमदाबादने हार्दिक आणि राशिदला प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शुबमन गिलला ७ कोटी रुपये मिळणार आहेत. हार्दिक पंड्या संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तो प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार होणार आहे.
हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. शुबमन गिल कोलकाता नाइट रायडर्सचा एक भाग होता आणि अफगाणिस्तानचा राशिद खान सनरायझर्स हैदराबाद संघात होता. यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव होणार आहे.