मुंबई – 26 मार्च पासून सुरु होणारे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमला भेट दिली आहे. कोरोनामुळे संपूर्ण आयपीएल यावेळी मुंबई आणि पुणे मध्ये होणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या सदस्याने सांगितले की आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी आयपीएल 2022ची व्यवस्था करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन/बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली.
मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे आयोजन करताना महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मी आज वानखेडे स्टेडियमला भेट दिली, कारण आम्ही स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी उत्सुक आहोत. आम्ही सर्व संघांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहोत असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १० संघांचे गट जाहीर करण्यात आले आहे. हे संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध दोनदा आणि उर्वरित चार संघांविरुद्ध फक्त एकदाच खेळताना दिसेल. सर्व १० संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.











