मुंबई – नुकताच वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कुलदीप यादव ने सहा महिन्यानंतर पुनरागमन केले आहे तर रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. तर के. एल. राहुल उपकर्णधार असणार आहे. तसेच विराट कोहलीचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.
भारताची वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय आणि टी20 मालिका सहा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर के.एल. राहुल फक्त दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असेल. जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात असून तो या मालिकेला मुकणार आहे.’
बीसीसीआय जडेजासोबत धोका पत्करू इच्छित नाही. जडेजाने पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर संघात पुनरागमन करावे, अशी त्याची इच्छा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याची गरज भासणार आहे.
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
T20I संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.











