मुंबई – भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान बेंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात अष्टपैलू अक्षर पटेलचा संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात जयंत यादव याच्या जागी तो संघात दिसण्याची शक्यता आहे.
परंतु अक्षरच्या जागी कुलदीप यादवला संघात संधी देण्यात आली नाही. तो भारताच्या मुख्य संघाचा भाग होता, परंतु अक्षर तंदुरुस्त झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघात तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांची गरज नसल्याचे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. जडेजा आधीच टीम इंडियाचा भाग आहे. त्याचवेळी अक्षर आणि कुलदीपही संघाशी जोडले गेले आहेत.
जयंत यादव आणि रविचंद्रन अश्विन हे आधीच टीम इंडियात खेळत आहेत. यानंतर संघात जडेजा, अक्षर आणि कुलदीपसह एकूण पाच फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे 18 जणांच्या संघात पाच फिरकी गोलंदाजांची गरज नाही. यामुळे कुलदीपला संघातून वगळण्यात आले आहे.
भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज , उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)