मुंबई – नुकताच 2021 साठी ICC ने टेस्ट टीमची घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघाचे तीन खेळाडूंचा समावेश ICC ने केला आहे. तर या संघाच्या कर्णधारपदी न्यूझीलंडचा केन विल्यमसनची (Ken Williamson) निवड करण्यात आली आहे.
सलामीवीर रोहित शर्मा( Rohit Sharma) , यष्टिरक्षक ऋषभ पंत (Rishabh pant) आणि अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांना आयसीसी कसोटी (ICC Test Team) संघात स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीच्या कसोटी संघात सर्वाधिक तीन खेळाडू भारत आणि पाकिस्तानचे आहेत. त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याच्याशिवाय काईल जेमिसन हा संघातील दुसरा किवी खेळाडू आहे. पाकिस्तानच्या हसन अली, फवाद आलम आणि शाहीन आफ्रिदी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांचाही संघात समावेश आहे.
ICC च्या ODI आणि T20 संघात कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला नव्हता. 2021 मध्ये भारतीय संघ फार कमी एकदिवसीय सामने खेळला आणि टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. याच कारणामुळे भारताचा एकही खेळाडू या दोन संघात स्थान मिळवू शकला नाही.












