CID चा नवीन सीझन येणार का? एसीपी प्रद्युम्न म्हणतात…

570

मुंबई – सीआयडी (CID) हा नाव समोर येताच कुछ तो गडबड है हा डायलॉग म्हणणारे एसीपी प्रद्युम्न यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. या मालिकेमध्ये ही भुमिका मराठी अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारली होती. त्यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये त्यांच्याकडे आता कोणतेही काम नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, मला आता प्रचंड काम मिळत आहे, असे मी म्हणू शकत नाही. जर माझ्याकडे काम नसेल तर मी नाहीच म्हणेन. माझ्याकडे आतापर्यंत अनेक रोल आले आहेत, मात्र ते फार काही खास नाहीत. मी मराठी रंगभूमीतील आहे आणि मी माझ्या आयुष्यात फक्त अशाच प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे ज्याचा मला आनंद होतो.

या मुलाखतीमध्ये त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून सीआयडीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु आहे, हे खरं आहे का? त्यात तुम्ही पुन्हा एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर उत्तर देताना शिवाजी साटम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीआयडीचे निर्माते वेगळ्या प्रकारे हा शो पुन्हा सुरु करण्याबद्दल बोलत आहेत. याबद्दल चर्चाही सुरु आहेत. मात्र अद्याप यात कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी हे सर्व तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याचे दिसत आहे. तसेच जर उद्यापासून सीआयडीचा नवा सीझन सुरु झाला तर मी लगेचच एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारण्यासाठी तयार होईन. मला ही व्यक्तिरेखा साकारताना अजिबात कंटाळा आलेला नाही. त्याउलट आता घरी राहून कंटाळा आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here