परभणी : परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार स्वतः खासदार संजय जाधव यांनी परभणी येथील नानल पेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.२७) रात्री दिली.
परभणीचे खासदार संजय जाधव यांना दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. परभणीतुन दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे असे खासदार संजय जाधव यांनी पोलिसांना सांगितले. मंगळवारी नांदेडमधील रिंद्धा नावाच्या मोठी टोळी या प्रकरणी कार्यरत आहे असे त्यांनी सांगितले. जीवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतील असावा असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे.