केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे. हे उपभोक्ता मूल्य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल.
या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. रिपोर्ट्सनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करू शकते आणि सविस्तर माहिती जारी करू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डीए देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे आणि याची प्रक्रियादेखील सुरू होणार होती, मात्र मार्चमध्ये कोरोना महासाथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये डीए देण्यावर बंधन लावले. हे नियंत्रण 2021 पर्यंत लावण्यात आले आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता दिला जातो तो 17 टक्के आहे. नुकतेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी प्री-पेड भेटवस्तू घोषित केल्या होत्या. या शॉपिंग कार्डचा उपयोग कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत करू शकतात.