२७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा
देशभरातील १०० पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या.
संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) गटाने पुकारलेल्या 27 सप्टेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये सुमारे 100 राष्ट्रीय राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटना, शिक्षक, महिला, युवक, मजूर आणि इतर सहभागी होतील. एटक राष्ट्रीय कार्यसमितिचे सदस्य डॉ.भालचंद्र कांगो यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत 100 संघटनांच्या 200 हून अधिक नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप-आरएसएस राजवटीच्या दिवाळखोर धोरणांविरोधात शेतकरी, कामगारांचे प्रश्न आणि ‘भारत बंद’चे महत्त्व, आदी विषयांवर महत्त्वपुर्ण चर्चा करण्यात आली, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिली.या बैठकीत राज्यातील आणि इतर सर्व संघटनेतील समर्थकांची जमवाजमव आणि महाराष्ट्रात ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. एका शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने पुढील सोमवारच्या देशव्यापी कारवाईसाठी महाविकास आघाडी पक्षांना पाठिंबा दर्शवला.










