१० एप्रिल रोजीची लोक अदालत स्थगित
वाशिम, दि. ०६ (जिमाका) : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शनिवार, रविवारी संचारबंदी घोषित केली आहे. त्यामुळे शनिवार, १० एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली लोक अदालत रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दिली आहे. तसेच लोक अदालतीची पुढील तारीख लवकरत जाहीर करण्यात येईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.