मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांना नुकताच जामीन मंजूर झाला असून आज सकाळी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महा विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो. असंही यावेळी नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की पहिल्या दिवसापासुन म्हणजे 18 डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली, ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी मदत, माहिती हवी होती. सगळ्या तपासकार्यात मी सतात्याने मदत करत होतो आणि तशीच मदत या पुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला तपास कार्यात माझी मदत लागेल. मला न्यायालायने ज्या अटी शर्थी लावून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या अटी शर्थींचं पालन करून आणि चौकशी अधिकरी जेव्हा जेव्हा मला बोलावतील, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यात मदत मी कालही केली होती, आजही करणार आणि पुढेही करणार आहे.
मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. मला जेव्हा जेव्हा फोन आले, जेव्हा जेव्हा माझ्याशी संपर्क केला गेला. तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, जात होतो, बोलत होतो तेव्हा माध्यमांनी देखील ते दाखवलं आहे. कुठ्ल्याही तपासकार्यात मी कधी अडथळे आणले नाहीत, कुठली माहिती लपवली नाही. मला जी नोटीस मिळाली, जे काही प्रश्न विचारले ती सगळी माहिती जेवढी माझ्याकडे होती ती सर्व माहिती मी देत होतो. यापुढेही मी देणार आहे.
जे माझ्यावर आरोप होत होते की, हे राजकीय आजार आहे. न्यायलयीन कोठडी होती म्हणून याने राजकीय आजार काढले आहेत. चला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलतोय, त्याला तुरुंगात जायचं नाही. पण माझी जी वैद्यकीय तपासणी व्हायची, जे काय माझे रिपोर्ट काढले होते ते देखील काही खोटे होते का? कोणाच्याही तब्यतीबाबत अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करणे, ही किती नैतिकतेमध्ये बसतं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? हा विचारही थोडा आपण करायला हवा अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.