हिजाब वादावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

522

मुंबई – कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजब घालण्यास बंदी घातल्याने हा वाद आता वाढला आहे. या मुद्द्यावरून देशभरात देशभरात पडसाद उमटत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ने देखी ट्विट करत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.

स्वरा भास्करने कर्नाकटमधील घटनेचा व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तिने हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘भेड़िये’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर कर्नाकटमधील या घटनेनंतर कमल हसन, रिचा चड्ढा यांनी आंदोलकांवर मुलींची छेडछाड केल्याबद्दल टीका केली होती. त्यापाठोपाठ जावेद अख्तर, स्वरा भास्कर यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे.

प्रकरण काय
कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर या मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये सुरु झाला.

दरम्यान कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here