नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाची समजली जाणा-या सौंदाळा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्याने आज मासिक सभेत सर्वांनुमते उपसरपंचपदी निवडसाठी सुचना श्री.सचिन अशोक आरगडे यांनी केली.त्यास अनुमोदन श्री.रामकिसन चामुटे यांनी दिले.त्यानंतर उपसरपंचपदी बिनविरोध सौ.रुक्मीणी मारुती आरगडे यांची निवड करण्यात आली.सौंदाळा ग्रामपंचायत .
यावेळी माजी उपसरपंच श्री.कानिफ आरगडे यांचा सत्कार श्री.कल्याण आरगडे व श्री.दादासाहेब आरगडे यांच्या हस्ते करण्यात आला व नवनियुक्त उपसरपंच सौ.रुक्मीणी आरगडे यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच सौ.प्रियंका आरगडे यांनी केला.तसेच सौंदाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.रविंद्र पागिरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने बाळासाहेब बोधक यांनी सत्कार केला.सौंदाळा ग्रामपंचायतयावेळी ग्रामसेवक श्री.रेवननाथ भिसे,सोन्याबापु आरगडे,सविता आरगडे,बबन आरगडे,जगन्नाथ आढागळे आदी उपस्थित होते.नवनियुक्त उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ.रुक्मीणी आरगडे यांचे जलसंधारण व मृद मंञी नामदार श्री.शंकरराव गडाख व मा.आमदार श्री.चंद्रशेखर घुले तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांनी अभिनंदन केले आहे.