सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..

338

मुंबई – राज्यसरकारने (State Government)नुकताच मोठा निर्णय घेत राज्यातील किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये द्राक्ष बागायतदार तसंच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी वाईन विक्रीची परवानगी दिली आहे.

विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी वाइन विक्रीचा निर्णय आणि विरोधासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणालेत की, वाइन तसंच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचं कारण नाही.

हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर त्याच्यात फारसं वावगं होणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here