*सी आर पी एफ जवानाचा स्वतःच्या विवाहित मेहुणीवर अत्याचार*
गणेश बबन गिरी असे आरोपीचे नाव_
_बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन बदनामीच्या च्या धमक्या_
_नराधम जवानावर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल_
या विषयी सविस्तर माहिती अशी की, सी आर पी एफ मध्ये नोकरीवर असलेल्या गणेश गिरी हा २०१७ मध्ये मुंबई येथे राहत होता. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील गणेशची मेहुणी काही कामा निमित्त मुंबई येथे आपल्या बहिणीकडे गेली होती. गणेशने मेहुणी समोर आपल्या पत्नीला मारहाण केली व पत्नी समोर मेहुणीला म्हणाला की तू जर मला शारीरिक संबंध करू दिले नाही तर तुझ्या बहिणीला मारुन टाकीन असे म्हणून बहिणी समोर शारीरिक संबंध केले याच दरम्यान गणेशने मेहुणी व पत्नी या दोघांना कळू न देता व्हिडिओ चित्रिकरण केले बनवलेला व्हिडिओ लोकांच्या मोबाईलवर टाकून देण्याची धमकी देत तीन दिवस शारीरिक संबंध केले. काही दिवसानंतर पीड़ित महिला गल्लेबोरगाव गावाकडे परतली गणेश गिरिने २०१९ पर्यंत मेहुणीला मुंबई येथे वारंवार बोलावून ७ ते ८ वेळा अत्याचार केला.
▪️ दिलेल्या तक्रारीवरून गणेश बबन गिरी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखला करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलीस नाईक यतीन कुलकर्णी करीत आहेत.










