सीआयडी अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

360

अहमदनगर – जिल्ह्यात बनावट सीआयडी अधिकारी ओळखपत्र जवळ बाळगुन लोकांची फसवणुक करणाऱ्या एका आरोपीला सुपे पोलीसांनी अटक केली आहे. संदिप आत्माराम खैरनार असे या बनावट सीआयडी अधिकाऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासुन उच्च पदस्थ अधिकारी म्हणुन लोकांची फसवणूक करण्याची घटनामध्ये वाढ पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की प्रल्हाद मोहन जावळे हे येवला येथुन पुणे येथे जात असताना सुपेमध्ये सफलता हॉटेल जवळ एका अनोळखी इसमाने प्रल्हाद जावळे यांच्या जवळ गाडी थांबवून त्यांना दमदाटी तसेच शिवीगाळ करू लागल्याने जावळे यांनी या घटनेची तत्काळ सुपा पोलिसांना माहिती दिली असता सुपा पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार तत्काळ घटनास्थळी जावुन खात्री केली असता त्या इसमाने मी सी . आय . डी डीपार्टमेंट चा अधिकारी असलेबाबत पोलीसांना सांगितले.

मात्र त्याचे हालचालींवरुन बनावट सी.आय.डी. अधिकारी असल्याचा पोलीसांना संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा इसम तोतया सी.आय.डी अधिकारी असुन तो बनावट ओळखपत्राद्वारे लोकांची फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झाले .

पोलीस जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी फसवणुक केली आहे . याबाबत विचारपुस करत असुन आरोपीचे ताब्यातुन बनावट सी.आय.डी. अधिकारी असल्याचे ओळखपत्र , आधारकार्ड , मोटार सायकल , काठी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here