मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खान नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. त्याच तो लग्न कधी करणार हा प्रश्न नेहमीच त्याला विचारण्यात येतो. मात्र आता स्वतः त्याने या प्रश्नाचा उत्तर दिला आहे. त्याने बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये हा खुलासा केला आहे.
बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल ग्रँड फिनालेमध्ये आली होती त्यावेळी सलमानने हा खुलासा केला आहे. यावेळी शहनाज गिलनेकतरिना कैफचे नाव घेऊन सलमान खानला चिडवत होती. शहनाज म्हणते की मी पंजाबच्या कतरिना कैफपासून भारताची शहनाज गिल बनले आहे कारण भारताची कतरिना कैफ पंजाबची कतरिना झाली आहे.
शहनाजचे म्हणणे ऐकल्यानंतर सलमान खान म्हणतो की, हे बरोबर आहे. सगळे खूश आहेत. यावर शहनाज सलमानला म्हणते की सर तुम्ही खुश राहा.
यानंतर ती म्हणते की सॉरी मी जास्त बोलले नाही ना. यानंतर शहनाज म्हणते की सिंगल्स अधिक चांगले दिसतात. यावर सलमान म्हणतो की हे चांगले आहे.यानंतर शहनाज सलमानला विचारते, मग रिलेशनशीपमध्ये आहात का? यावर सलमान खान हो म्हणतो.