श्वेता तिवारीच्या विरोधात ब्रा बद्दलच्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल;वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गुन्हा:

श्वेता तिवारीच्या विरोधात ब्रा बद्दलच्या ‘या’ वक्तव्यामुळे गुन्हा दाखल

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गुन्हा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) भोपाळमध्ये कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्य चांगलेच भोवणार असे दिसते आहे.

मध्य प्रदेश राज्य सरकारने केली कारवाईश्वेताने जाहीर माफी मागण्याचे हिंदूत्ववादी संघटनांची मागणीमुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

श्वेताने देवासंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून तिच्याविरोधात भोपाळमधील श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १९५ अ अंतर्गंत श्वेताविरोधा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

श्वेता तिवारीवर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आला आहे. एका वेब सीरिजच्या प्रमोशन कार्यक्रमात गंमतीमध्ये श्वेता म्हणाली होती की, ‘तिच्या ब्राची साईज देव घेत आहे.’ श्वेताला ही मस्करी करणे आता चांगलेच महागात पडले आहे.

या वक्तव्यावर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर काही हिंदूत्ववादी संघटनांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे.

श्वेताने केलेल्या या वक्तव्याची दखल मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीदेखील घेतली. इतकेच नाही तर याची सखोल चौकशी करण्याचे आदेश भोपाळचे आयुक्त मकरंद देऊस्कर यांना दिले असून २४ तासांत अहवाल देण्यास सांगितले आहे.

भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देऊस्कर यांनी सांगितले की, ‘गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मिळाले आहेत. आम्हाला देखील याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामध्ये काय कारवाई करता येऊ शकेल याचा तपास केला जात आहे. त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल.’

दरम्यान, श्वेता तिवारी आणि वेब सीरिजच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. संस्कृती वाचवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी तर श्वेता तिवारीचा निषेध करत तिचे पोस्टर्स जाळली. इतकेच नाही तर या प्रकरणी श्वेताने सार्वजनिक माफी मागावी.

तिने जर माफी नाही मागितली तर या वेब सीरिजचे चित्रीकरण भोपाळमध्ये होऊ देणार नाही, असा इशाराही हिंदू संघटनांनी दिला. आता अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकरणावर माफी मागितली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here