श्रीरामपूर तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

416

अहमदनगर- श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितनुसार पढेगाव येथील प्रशांत बाळासाहेब तोरणे (वय २३) या तरुणाने गळफास घेतल्याने त्यास तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच सदर तरुण मयत असल्याचे सांगितले.

याप्रकरणी साखर कामगार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here