शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार पुणे शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ३१ वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समीर बाळू निकम (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.ऑक्टोबर २०१७ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसरात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी समीर हा शॉर्टफिल्म बनवतो. त्याने काही गाणी देखील तयार केली आहेत. शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विवाहित महिलेशी ओळख वाढवली. त्यांना फिल्म इंडस्ट्रीत स्थायिक करण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने त्याने पीडित विवाहिते सोबत वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
- English News
- Conference call
- Crime
- Degree
- Gas / Electricty
- Insurance
- Lawyer
- Loans
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अकोला
- रायगड
- अलिबाग
- अहमदनगर
- उत्तर प्रदेश
- उंब्रज
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- खेळ
- Education
- दिल्ली
- देश-विदेश
- पुणे
- पिंपरी
- बारामती
- लाईफस्टाईल
- वर्धा
- सातारा
- सोलापूर